
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
ढोकी/पारनेर:-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील ढोकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक मंगळवार दिनांक २४ मे २०२२ रोजी जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांचे कडील अधिसूचना प्रमाणे पारनेर येथे दुपारी १ वा. मा. गणेश औटी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चेअरमन पदासाठी बाबासाहेब वामन न-हे व अशोक बापू धरम यांनी अर्ज दाखल केला,तर व्हा चेअरमन पदासाठी शंकर कुंडलीक धरम व पोपट हरिचंद्र वाकचौरे यांनी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रक्रिया पार पडून बाबासाहेब वामन न-हे ८ विरुद्ध ५ मतांनी विजयी झाले तर व्हा. चेअरमनपदासाठी शंकर कुंडलीक धरम ८ विरुद्ध ५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.संस्थेचे सचिव सयाजी खटके यांनी सहाय्यक अधिकार्यांची भूमिका पार पाडली. हुसेन गुलाब पठाण, भागचंद विश्वनाथ धरम, कोंडीभाऊ म्हपा धरम, पोपट नाथा खटके, सयाजी दशरथ न-हे, दादाभाऊ आनंदा गायकवाड या संचालकांनी विजयासाठी मतदान केले.
२४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या ढोकी विविध कार्यकारी सेवा सोसायटी या निवडणुकीत शिवसेना प्रणित जय हनुमान सहकार पॅनल चा ११/२ असा विजय झाला होता.
“सभापती काशिनाथ दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाच वर्षाच्या काळात सोसायटीचा स्वच्छ कारभार करणार, सभासदांची कर्जाची प्रकरणे, गाय-गोठ्यांचे प्रकरणे, अशा अनेक सोसायटीच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या सक्षमपणे राबवणार तसेच सोसायटीचे स्वस्त धान्य दुकान खाजगी आहे ते सोसायटीला जोडण्याकरीता प्रयत्न करणार : बाबासाहेब न-हे, चेअरमन ढोकी”
यावेळी शिवसेना युवा तालुका उपप्रमुख शुभम टेकुडे, युवा नेते कैलास न-हे, माजी सरपंच भाऊसाहेब मोरे, बापू मोरे, बाबासाहेब न-हे, शिवाजी धरम, बापू न-हे, रावसाहेब न-हे, संदीप न-हे, किसन खटके, रामदास न-हे, प्रवीण धरम, बाबासाहेब धरम, ऋषी धरम, साबुद्दिन पठाण, वसीम पठान, बापू गायकवाड, गोरख मोरे, आबा वाकचौरे, प्रवीण न-हे, मारुती धरम, संपत धरम, एकनाथ धरम, भाऊ भुसारी, लहानु धरम, नामदेव भुसारी, भास्कर न-हे, आप्पा न-हे, संतोष खटके, आप्पा खटके, रामदास न-हे, भगवान खटके, भाऊसाहेब धरम, निलेश खटके,दिनकर खटके, रावसाहेब धरम, राहुल नर्हे संतोष धरम, किसन धरम, प्रशांत धरम, रामा चितळकर, राजू मोरे, विजय खटके, सचिन न-हे, प्रवीण न-हे, हमिद पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.