
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – जपानची राजधानी टोकियो येथे चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक सुरू आहे. दरम्यान, चीन आणि रशियाने अतिशय गंभीर कृत्य केले आहे. जपानच्या सीमेजवळ युद्ध कवायतीत चीन आणि रशियाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केले. खुद्द जपान सरकारने याला दुजोरा दिला आहे.
दोन्ही देशांच्या या कारवाईवर क्वाडमधील उर्वरित तीन देशांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चौघांचा समावेश आहे. चीनचा आरोप आहे की क्वाड सदस्य त्याचे सागरी मार्ग बंद करण्याचा कट रचत आहेत आणि त्यांना बळाच्या माध्यमातून दबाव आणायचा आहे. क्वाड सदस्यांनी वारंवार चीनचे आरोप फेटाळले आहेत.