
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाला आता ३ महिन्यांहून अधिक काळ उलटत आला त्यामुळे त्याचे परिणाम जगभरात होत असल्याचं दिसून येत आहे. जगात अन्न संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अनेक देशात घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या खाद्य वस्तू आवश्यक साठा नसल्याने निर्यातीवर बंदी आणली जात आहे. गहू, साखर निर्यातीवर भारताने बंदी आणली आहे. आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची तयारी करत असल्याचं सांगितले जात आहे.
पंतप्रधान कार्यालय घरगुती खाद्य वस्तूच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी पाऊल उचलत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ गरजेच्या वस्तू निर्यात करण्यावर रोख आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यातील यादीत गहू, साखरेच्या निर्यातीवर आधीच बंदी आणली आहे. आता येणाऱ्या काळात तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ निर्यात होणार नाहीत. गहू आणि साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.