
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
हिंदुस्थानातील संपुर्ण मुगल साम्रज्या गुढग्यावर आणुन देशाचे प्रथम स्वातंत्र्यता सेनानी म्हणुन ओळखले जाणारे महापराक्रमी वीर हिंदसूर्य महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड किल्ल्यात झाला त्यांच्या वडीलाचे नाव राणा उदय सिंह आणि आई चे नाव महाराणी जयवंता बाई हे होते. त्याचे वडील उदयसिंह मेवाडचे राजा होत. ज्याची राजधानी चित्तूर होती. महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समुदायाबरोबर गेले होते. त्यांनी भिल्लांकडुन मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले होते. भिल्ल आपल्या मुलाला किक असे संबोधतात म्हणुन भिल्ल महाराणाला किक नावाने हाक मारत होते.
राज्याभिषेक
इ.स. 1568 मध्ये उदयसिंह रणवीर आनोसे दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करुन आला. या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. उदयसिंह यांनी 1559 मध्ये उदयपुर शहराची स्थापना केली. महाराज उदयसिंह आणि त्यांची सर्वात प्रीय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदासिंह यांची इच्छा होती पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यु नंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्या करभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेका आधि मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्या बाहेर घालवुनदिले आणि प्रताप यांस मोवाडचा राजा म्हणुन घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडीलांच्या इच्छेविरुध्द राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यांनी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवुन दिले राजपथावार बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला. एक कुशल योध्दा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणुन त्यांनी आपला लौकिक निर्माण केला.
हळदीघाटाची लढाई
1 जुन 1556 रोजी हळदीघाटभ्ची लढाई आमेरच्या मानसिंह (अकबरचा सेनापती ) याच्य नेतृत्वात महाराणा प्रतापसिंह आणि अकबरच्या सैन्यामध्ये झाली. लढाईचे ठिकाण राजथानमधील आधुनिक काळातील राजसमंद गोगुंडाजवळील हळदीघाटीजवळ एक अरुंद डोंगराळ खिंड होती. प्रतापसिंग यांनी सुमारे 3000 घोडदळ आणि 400 भिल्ल तिरंदाजीची फौज तयार केली. मोगलांचे नेतृत्व अंबर येथील मानसिंग करीत होते आणि त्यांने सैन्यात सुमारे 8,50,000 पायदळ,घोडदळ,बंदुकी तोफा होत्या या हल्दीघाटीच्या युध्दात महाराणा प्रतापांनी मुघलांना सळो की पळो करुन सोडले. मेवाडच्या मुठ्ठीभर सेनेपुढे अकबराची लाखाची सैन्यतुकडी हार मानु लागली होती. महाराणा प्रताप यांनी अकबराच्या सेनापतीला संपवून क्षत्रियांचा कलंक मानसिंगच्या दिशेने आपला मोर्चा वळवला इकडे महाराणा मानसिंग सोबत लढायला गेले. मानसिग हा हत्तीवर बसुन युध्द करत होता तर महाराणा आपल्या प्रिय घोडा चेतक वर बसुन हातात 80 किलोचा भाला घेऊन युध्द करत होते. मानसिंगला बघून चेतक ने आपले दोन्ही पाय हत्तीच्या मस्तकावर ठेवले एवढ्यात महाराणा आपला भाला फेकला तेवढयात हत्तीच्या सोंडेला लागलेली तलवारीमुळे चेतकचा एक पाय कापला गेला मानसिंग त्या रुद्र अवतार महाराणा प्रतपांचा रुप बघुन घाबरला आणि आपल्या महावताच्या मागे लपुन बसला. चेतक चा एक पाय कापल्या मुळे महाराणा प्रतापांचा भाला मानसिंग न लागता चुकून त्याच्या महावतला लागला हे दृश्य बघुन मानसिंग ने मागच्या बाजुला उडी मारून सेनेत लपुन बसला पण काही वेळात युध्द सोळुन पळुन गेला. तेवढ्यात गद्दार मुघलांनी लपुन महाराणा प्रतापांच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या एकाने लपुन महाराणांच्या पाठीवर बाण मारला. पन त्यांना बाण लागला आहे हे पन जानवला नाही दोन गोळ्या पायाला लागल्या मुळे महाराणा आणि चेतक प्रचंड घायळ झाले होते युध्द करण्याच्या स्थितीत न्हवते त्यामुळे त्यांच्या सरदारांनी या हिंदुस्थानाचा स्वामी जिवंत राहावा भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले तरच हे अत्याचारी मुघल आपल्या भुमीत पाय रोवु शकत नाही हे त्यांना माहित होते म्हणुन जबरदस्तीने महाराणा प्रतापांना हात जोडून सर्व सरदार म्हणले राणाजी आज जर तुम्ही या युध्दातुन गेले नाही तर आम्ही न लढताच आमचा शिरच्छेद करून घेईल तुमचं जगणं या मेवाड साठीच न्हवे तर संपुर्ण हिं दुस्थानासाठी आवश्यक आहे तर कृपा करून युध्दभुमीतुन आपण निघाव आम्ही आहोत न अस म्हणुन महाराणा प्रतापांच मेवाडमुकुट त्यांच्य एका सरदाराने घेतल महाराणा प्रतापांच दुसरं प्रतिबंध आपण म्हणुन शकतो त्यांचा नाव झाला मानसिंग (दिसण्यात दुसरे महाराणा) त्यांनी महाराणा प्रतापांच मेवाड स्वत: परिधान करुन म्हणाले आज तरी एक दिवस महाराणा बनु द्या राणाजी महाराणा म्हणुन जन्मलो नसेल तर आज महाराणा म्हणुन मरेल याहुन मोठी गोष्ट तुमच्या या सेवकाची अजुन काय असेल असे म्हणुन सर्व सरदारांने महाराणा प्रतापांना युध्द भुमितुन पाठवुन दिले. इथे वाढती मुघल सेनेला वाळल झाला मानसिंगच महाराणा आहे तर या वीर योध्याने महाराणा प्रतापासाठी लढता लढता वीरमरण प्राप्त केले. आणि तिथे चेतक महाराणा प्रतापांना घेऊन जात असताना एक मोठी दरी त्याच्या समोर आली तो डगमगला नाही 28 फुट दरीच्या उंचीवरुन चेतकने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजुला घेऊन महाराणा प्रतापांना सुखरुप पोहचवले व ताण बसल्यामुळे वीर चेतक स्वामी भक्त चेतकाचा ही मृत्यू झाला. महाराणा कधी आयूष्यात कधी रडले होते तर चेतकच्या मृत्यूलाच. तिथे युध्द सुपुर्ण संपल मानसिंग पळुन काशिला एक महीणा लपुन बसला की आता जर दिल्लीच्या दरबारात गेलो आणि सांगितलं अकबर ला की महाराणा हरवु शकलो नाही आणि पकडूही शकलो नाही तर मृत्यू दंड देईल.ही खबर जेव्हा अकबरला कळते की हल्दीघाटीतुन मानसिंग पळुन आला
आणि महाराणा प्रताप यांना ही कोणी पकडले नाही तेव्हा अकबर मानसिंगचा दरबार प्रवेश काही महिने निषेध केला आणि बाकी सेनापतीच्या जहागिऱ्या काढुन घेतल्या.
मेवाडचा विजय
1582 मेध्ये महाराणा प्रताप देवर येथे मुघल चौकीवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली यामुळे मेवाडमधील मोगल सैन्याचा सर्व 36 चौक्या ताब्यात आल्या या पराभवानंतर अकबरने मेवाड विरुध्दची सैन्य मोहिम थांबवली. अश्या वीर योध्द्याचा राजस्थानातील चवण येथे 29 जानेवारी 1597 साली मुत्यु झाला.
अश्या या शुर वीरास विनम्र अभिवादन.
मारोती धर्माजी बट्टलवाड
मुख्याध्यापक जिल्हा परिषद
प्राथमीक शाळा पांगरी
ता.लोहा.जि.नांदेड
मो.8208493077