
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी= बाळासाहेब सुतार
चाकाटी तालुका इंदापूर येथील उद्योजक राहुल रुपनवर यांच्या पत्नी धनश्री यांचे गेल्यावर्षी आकस्मित निधन झाल्यामुळे रुपनवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शुक्रवार दिनांक 3 रोजी वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने भाविक भक्त टाळकरी विणेकरी आणि किर्तन सेवेसाठी ह-भ-प श्रीराम अभंग महाराज यांची टाळ आणि मृदुंगात आवाजात कीर्तन सेवा संपन्न झाली. कैलासवाशी धनश्री रुपनवर यांच्या प्रतिमेवर दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.
नवनाथ (आबा) रुपनवर ऊपअध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या विनंतीला मान देऊन विविध भागातून धार्मिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर तसेच सोलापूर जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील चांदज, शशिकांत तरंगे, पाहुणे मंडळी मित्रपरिवार व भजनी मंडळ पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, पिठेवाडी, ओझरे, गोंदी, मृदंग वादक शुभम महाराज वायकुळे, विणकरी महेश सुतार महाराज आदी भजनी मंडळ भाविक भक्त ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.