
दैनिक चालु वार्ता निरा नरशिहपुर प्रतिनिधी-बाळासाहेब सुतार
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस 8 व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पुष्पहार अर्पण करून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शुक्रवारी ( दि.3) भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. लोकनेते गोपीनाथ मुंडे व हर्षवर्धन पाटील यांचे मित्रत्वाचे नाते होते. मुंडे साहेबांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या शेकडो आठवणी मनामध्ये दाठुन आल्या, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.