
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : समाजातील गरीब व दुर्बल घटकांना आर्थिक सवलती देण्यासाठीच्या मोदी सरकारच्या विविध लाभदायक योजना कार्यरत आहेत. त्यादृष्टीने राज्ये सरकारेही आपापल्या परीने अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करीत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पुणे महानगरपालिकेने अशीच एक सवलत योजना आणली आहे. आता पीएमपीएमएल च्या माध्यमातून पुणे शहरातील दिव्यांग नागरिक व केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्राविण्य (राष्ट्रपती पदक व शौर्य पदक) प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी पुण्यात बसने मोफत प्रवास करण्याची सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. या बद्दलची सविस्तर माहिती नागरिकांना https://dbt.pmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ ही आहे. तरी संबंधित नागरिकांनी ह्या मोफत प्रवास पास योजनेचा लाभ घ्यावा असे प्रशासनानाकडून आवाहन करण्यात आले आहे.