
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
पेठवडज:- अतिवृष्टीमुळे कंधार तालुक्यातील पेठवडज सिरसी बु. या गावाला मा.तहसीलदार साहेब कंधार यांनी भेट दिली पण आज पर्यंत शेतकरी यांना कुठलीच आर्थिक मदत मिळाली नाही व शेतकऱ्यांना होणाऱ्या पावसाच्या व नदीच्या दुरुस्ती झाली नाही.तरी नदी ची दुरुस्ती तात्काळ करावी व नागरिकांच्या पडलेल्या घरांची व विहिरींची दुरुस्ती करून द्यावी अन्यथा शेतकर्यांच्या वतीने कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन जाधव व्यंकटी, पांडुरंग कंधारे, माधव वडजे यांनी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे