
दैनिक चालू वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी-इंद्रसिंग वसावे
नंदुरबार जिल्ह्यात आगामी कालखंडात संपूर्ण वातावरण भगवेमय होणार यात तिळमात्रही शंका नाही नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशादादा पाडवी यांना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते संजयजी राऊत साहेबांच्या आशीर्वादाने विधान परिषदेवर आमदारपदी वर्णी लावून धडगाव-मोलगी मतदारसंघात आगामी निवडणुकीत शिवसेनेचा आमदार निवडून जाण्याचा मार्ग सुकर केला आहे, आमशादादा पाडवी यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याचे फायदे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून संपूर्ण महाराष्ट्राला संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीकोणाचे महत्त्व कळणार आहे, सामान्य कार्यकर्त्याला आमदारपदाचा मान मिळवून देणारे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब व चाणक्य संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांचे तमाम शिवसैनिकांच्यावतीने मनपूर्वक आभार व आमदारपदी वर्णी लागलेल्या आमशादादा पाडवी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा,