
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
माटरगाव (खामगाव) दि.८.माटरगाव शिवारातुन मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.यावरून काल रात्री पोलीस पथकाने माटरगाव येथील पूर्णकला कनिष्ठ महाविद्यालया समोर एक टिप्पर पकडले. या वेळी सदर टिप्पर मध्ये अवैधरित्या दोन ब्रास रेती किंमत दहा हजार रुपये मिळून आली.पोलीस पथकाने सदर टिप्पर जप्त केले असून या प्रकरणी जलंब पोलीस स्टेशनला अभिजीत संतोष खवले ( ३०) रा. कवठा यांच्याविरुद्ध कलम ३७९ भा.द.वी. तसेच सह कलम २१ (१) २१ (२) गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.