
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आठवडाभरात म्हणजे 15 जुलैला अधिसूचना जारी केली जाईल.
यासह नावनोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. नावनोंदणीसाठी सुमारे 2 आठवडे दिले जातील. नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जाहिर केले.