
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड: तालुक्यातील अजिंठा पोलिसांनी हद्दीतील अंभई, उंडणगाव, पानवडोद, डिग्रस ठिकाणी धाड टाकून सुमारे ७ हजार रुपये किमतीच्या ८९ देशी दारूच्या बाटल्यासह रोख असा २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैधरीत्या दारू विकणारे ५ तर जुगार खेळणाऱ्या एकाविरुध्द अजिंठा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम पठाण, बाबा चव्हाण, नीलेश शिरस्कर, अरुण गाडेकर, राम माळी, पोलीस नाईक विकास लोखंडे, बाबुराव साबळे, कौतिक चव्हाण यांनी ही कार्यवाही केली. पानवडोद ग्रा. पं. पाठीमागे टाकलेल्या धाडीत नीलेश उर्फ पप्पू गिरीधरलाल जयस्वाल याच्या ताब्यातून १३ देशी दारूच्या बाटल्या गोळेगाव- अंभई रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरेश हरिबा गवळी यांच्या ताब्यातून ४० दारूच्या बाटल्या, खंडाळा रोडवरील पुलाच्या बाजूला कडुबा नारायण नरवडे यांच्या ताब्यातून १२ देशी दारू बाटल्या, उंडणगाव येथीलच मांडणा रोडवर शिवाजी रामभाऊ सिंगारे याच्याकडून १२ देशी दारूच्या बाटल्या आणि डिग्रस येथे पिठाच्या गिरणीजवळ गंजीधर साहेबराव दौड याच्या ताब्यातून १० देशी दारूच्या बाटल्या, तर अंभई येथे एका पत्र्याच्या शेडच्या बाजूस जुगार खेळताना राजेंद्र नामदेव काळे याच्या ताब्यातून रोख रकमेसह मद्देमाल जप्त केला.