
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
एम. आय. डि. सी. :- रमाई चौक सिडको येथील व्हाॅ्ल्वव्दारे पाईपमधून पाणीपुरवठा केला जातो आहे. पाण्याच्या हौदात डुक्कर मरून पडले होते. परिसरातील नागरिकांनी डुक्कर काढले होते. पुन्हा मुतारी व चेंबर चे पाणी पाईपमधून व्हाॅ्ल्वव्दारे एम. आय. डि. सी. भागातील नळाना दुषित पाणीपुरवठा होतो आहे. तरी संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन पाईपलाईन दुरुस्त करून शुद्ध पाणी पुरवठा करावा असे रमाई चौक एम आय डी सी सिडको भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये असे नागरिकांनी चालू वार्ता शी कळविले आहे. प्रशासनाने वेळीच दुरुस्ती करुन जनतेला सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळा सुरू झाला असून गॅस्ट्रो, मलेरिया, काविळ, किडनी. स्टोन ईत्यादी होणाऱ्या रोगापासून नागरिकांना वाचवावे असे म्हटले आहे.