
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
श्री वाघेश्वर विद्यालय चर्होली बुद्रुक येथील १९९३ – ९४ मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २८ वर्षांनी सेन्हसंमेलन मेळावा झाला. या मेळाव्याला १९९३ -९४ मधील दहावीचे १७० पैकी १४० विद्यार्थी हजर होते. माजी शिक्षक मोठ्या प्रमाणात हजर होते. या शाळेत दोन दशके अधिराज्य गाजवणारे मुख्याध्यापक आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थेचे सहसचिव आणि श्री वाघेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आधारवड निकम सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला तीन ते चार तासांचा कार्यक्रम कमीत कमी आठ ते दहा तास चालला. सर्वप्रथम सकाळी श्री वाघेश्वर महाराज मंदिरात जाऊन श्री वाघेश्वर यांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
एकमेकांचे बदलेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल २८ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. चर्होली येथील श्री वाघेश्वर विद्यालयामध्ये १९९३ ते १९९४ या कालावधीत दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक – एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला.आणि हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर श्री वाघेश्वर विद्यालयात जाऊन बेंचवर बसून 1993 – 94 वर्गाचा अनुभव घेतला, आताचे मुख्याध्यापक पेटें सर यांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले, त्यावेळेस मुलांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर शाळेतील पन्नास ते साठ वर्षापूर्वीचा असलेला चिंचेचा पारावर बसून फोटो सेशन केले .
त्यानंतर मुक्ताई गार्डनमध्ये भव्य आणि दिव्य असा स्नेह संमेलन मेळावा झाला या मेळाव्यास खुप लांबून विद्यार्थी आले होते. काही विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातून काही संगमनेर जिल्ह्यातून काही पुण्यातून काही पिंपरी चिंचवड मधून हडपसर भागातून विद्यार्थी आले होते.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देत असताना काही विद्यार्थी भावुक पण झाले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत च-होली गावात गेलेले आपले बालपण जुन्या आठवणी यांना उजळा दिला. या कार्यक्रमास माजी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते त्यामध्ये संस्थेचे आधारवड शाळेचे माजी मुख्याध्यापक निकम सर ,चव्हाण सर, बेल्हेकर सर दौंडकर सर ,रोकडे सर साबणकर सर,घुडरें सर, वाघमारे सर आहेर मॅडम, धावडे सर जाधव के जी सर भालेराव मॅडम जाधव के बी सर आधाटे सर ,राऊत मॅडम उपस्थित होते आम्हाला आमच्या गुरुजनांनी अतिशय मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले, हे मार्गदर्शन लाखमोलाचे होते त्यांनी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना स्फूर्ती ऊर्जा निर्माण करून देणारी होती. जाधव सरांनी तर आपल्या भाषणात प्रत्येक विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कमीत कमी पाच वर्षे आयुष्यमान वाढेल असे सांगितले.
असा गेट-टुगेदर चा कार्यक्रम अनेक वेळा घ्यावा अशी त्यांनी विनंती पण केली आयर सरांनी पारंपरिक गाण्याचा आस्वाद आम्हा विद्यार्थ्यांना दिला त्यांच्या त्या जुन्या शैलीतील गाण्याने माजी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले तर आधाटे सरांनी विविध प्राण्यांचे आवाज काढून मुलांना आनंदित केले . काही शिक्षक आपल्या या माजी विद्यार्थ्यांना पाहून उच्च पदावरून भावुक पण झाले. सगळ्यात शेवटी निकम सरांनी आम्हाला भव मूल्य असे अनमोल असे मार्गदर्शन करून संस्थेचे आपल्या गावाचे आपले जिल्ह्याचे नाव कसे वाढेल याचे मार्गदर्शन केले. दुपारी मधुर सुरूची जेवणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख परेड झाली. प्रत्येक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर संयोजकांनी शेवटी लवकरच आपण फॅमिली गेट-टुगेदर घेऊ असे आश्वासन देऊन कार्यक्रम संपवला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहासाचे गाडे अभ्यासक साहित्यरत्न प्राध्यापक श्री संदीप भानुदास तापकीर आणि मधुमती घोडेकर यांनी केले