दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी -वृक्ष लागवड अन् संवर्धन ही काळाची गरज आहे. शासन त्याच्या परीने काम करित असले तरी त्यासाठी लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. अतनुरात व परिसरात झालेली वृक्ष लागवड इतरांसाठी प्रेरणादायी असून त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन नवनियुक्त जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.एस.मेढेवार यांनी केले.
जळकोट तालुक्यातील अतनुरात व परिसरातील गाव-वाडी-तांडा-वस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी गावात व माळरानावर वृक्षारोपण करित निसगोत्सव साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी एन.एस.मेढेवार, पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता संजय गर्जे, विस्तार अधिकारी ( पंचायत ) दयानंद घंटेवाड, सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबूराव कापसे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी कॉग्रेसचे लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, शिवसेनेचे जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, ग्रामसेवक फिरोज शेख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ईस्माईलसाब मुंजेवार, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, ग्रा.पं.सदस्य प्रमोद संगेवार, विठ्ठल बारसुळे, सुनिल कोकणे, राहुल गायकवाड, तंटामुक्ती समितीचे सदस्य बी.जी.शिंदे, आयुब शेख, चंदर गायकवाड, गुंडू बोडेवार उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त गटविकास अधिकारी मेढेवार यांचा ग्रामपंचायत कार्यालय अतनूर च्या वतीने सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक फिरोज शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
