
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथे अनेक गुणवंत व नामवंत विद्यार्थी घडविणाऱ्या सायन्स इन्स्टिट्यूट ने यंदा ही २०२१-२२ च्या १२ वी च्या निकाल बाजी मारुन घवघवीत यश संपादन केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक उच्च शिक्षण मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षा २०२२ मध्ये लोहा येथील सायन्स इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत सर्वोच्च निकाल दिला आहे.
यावर्षी क्लासेस मधील 90% च्यावर एकूण ०४ विद्यार्थी तसेच 85% च्यावर १६ विद्यार्थी व 80 टक्के च्यावर 38 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री दिगंबर हिलाल पाटील, साजिद शेख घोरबांड सरांनी कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या यशाचे सर्वाधिक श्रेय हे सायन्स इन्स्टिट्यूट असून कारण येथील शिक्षण पद्धती दिल्या जाणाऱ्या नोट्स व घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ह्या अत्यंत प्रभावी आहेत बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना प्राध्यापकांनी खूप व्यवस्थित असे मार्गदर्शन केले तसेच बोर्ड परीक्षेला कसे सामोरे जावे व जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याचे सविस्तर मार्गदर्शन दिले. त्यामुळेच आम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा मार्ग सुकर झाला असे मत सर्व गुणवंत विद्यार्थी आदित्य पवार, राणी लबडे, गीते रोहिणी ,भोळे प्रतिक्षा, भारती दिव्या, कृष्णा मोरे पाटील संध्या पाटील पृथ्वीराज शिरसागर परिक्षित होळगिर यशोदा खेडकर प्रदीप काळे आकांक्षा वाकडे मनीषा आनेराव सुरेंद्र बंडेवार कांचन कातुरे सचिन सोनवणे कुलदीप लोखंडे शुभम डहाळे वैभव आधी गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले.
लोहा मध्ये सन 2014 पासून सायन्स इन्स्टिट्यूट दर्जेदार शिक्षणासाठी लोहा व परिसरात अत्यंत प्रसिद्ध व नावलौकिक मिळवलेले सायन्स शाखेचे इन्स्टिट्यूट आहे. इन्स्टिट्यूटच्या वतीने पालकांना विनंती करण्यात येते की आपले पाल्य नांदेडला पाठवुन वेळ पैसा वाया न घालवता आपल्या पाल्यांना लोह्यातील अत्यंत दर्जेदार उच्चशिक्षित प्राध्यापक वृंद असलेल्या सायन्स इन्स्टिट्यूट मध्येच प्रवेश द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.