दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.१३: जिल्ह्यात कायदा व सुरक्षितता राखण्याच्यादृष्टीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ड्रोन, पॅराग्लायडींग, हॉट बलून सफारी, मायक्रोलाईट एअरोप्लेन अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास मनाई आदेश लागू केले आहेत.
सदर आदेश १४ जून रोजी ००.०० पासून १४ जून रोजी सायं. ६ वाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
