
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
मोलगी:- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हे मुख्य बाजापेठेचे ठिकाण असून या ठिकाणी नर्मदा किनारीवरून लोकं बाजारासाठी येतात पण मोलगी गावातील लोकांसाठी व बजारासाठी आलेल्या नागरिकांसाठी मुख्य बाजारपेठेतील बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे सकाळी खूप मोठ्या ट्र्याफिक समस्येचा सामना अनेक दिवसापासून करावा लागत आहे.या वातुक समस्येने नागरिक वैतागले आहे.
मोलगी गावातली बाजारेठेमध्ये सकाळी दुर-दुर गावातील नागरिक बाजारासाठी येत असून सद्या बाजारात लग्नासाठी,व खरीप हंगामासाठी जीवन उपयोगी वस्तूंच्या खरेदी साठी मोठी गर्दी होत आहे.तसेच मोलगी हे आमचूर व्यवसायाचे मुख्य ठिकाण असल्याने परिसरातील व धडगाव तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी मोलगी गावात पाहायला मिळत आहे.सद्या आमचुरला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आपले आमचूर बाजारात विक्री साठी आणत आहेत.पण गावातील बेशिस्त वाहान पार्किंग ही मुख्य बाजापेठे,अक्कलकुवा रोड,व धडगांव रोडवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे होते.या होणाऱ्या सातत्यपूर्ण वाहतूकोंडीमुळे नागरिक वैतागले आहे. ही वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पोलीस प्रशासन जोपर्यंत कठोर पावले उचलत नाही तोवर ही समस्या कायम राहणार आहे. मोलगी गावातील मुख्य रस्ता हा धडगांव,वडफळी,मांडवा,या गावांना जडणारा आहेत या मुख्य रस्त्यावर एक जरी गाडी बेशिस्त पार्क केली तरी पूर्ण वाहतू कोंडी होते.पण परिस्थीती अशी आहे की सर्व गाड्या मेन रोडवर उभ्या असलेल्या व हातगाड्या,लॉरी, आमचुरचे ढीग रस्त्यावरच लागत असल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे.यावर प्रशासन मात्र काही उपाय योजना करीत नाही त्या मुळे समस्या अधिक बिकट होत चालली आहे.प्रशासनाने या सस्येबाबत अधिक जागरूकता ठेवून कायमस्वरूपी उपाय योजना करण्याठी अशा बेशिस्त पार्क वाहनांवर दंडात्मक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.