
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर: भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, यापूर्वी चे शिवसैनिक तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका संघटक,उपाध्यक्ष व सहसचिव अशी जबाबदारी सांभाळलेल्या व संघटनात्मक कामात दिलेली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडणारे जयदीप वरखिंडे यांनी जागर जनतेच्या या शिवसेनेच्या देगलूर येथील नगरेश्वर मंदीर मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी जयदीप वरखिंडे यांचा शिवसेनेत असंख्य कार्यकत्यासोबत प्रवेश केला. नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, जागर जनतेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते डाॅ.शोभाताई बेंजरंगे, उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर उपस्थित होते. हे शिवबंधन बांधताना तालुका प्रमुख महेश पाटील यांनी पुढाकार घेतला.
जयदीप वरखिंडे यांच्या प्रमाणे असे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले पाहिजेत यामुळे शिवसेना अधीक मजबुत होईल असा आशीर्वाद जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी व्यक्त केला. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संस्थापक अध्यक्ष किशनराव वरखिंडे यांचे ते चिरंजीव असून सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेना-भाजप च्या काळात महामंडळाची स्थापना झाली या कामी किशनराव वरखिंडे यांचे प्रयत्न मोठे होते. असा गौरवपूर्ण उल्लेख जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी केला.
उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर, तालुका प्रमुख महेश पाटील, पांडूरंग पाटील थडके देगावकर, मैलागीरे, जोशी, भागवत पा.सोमुरकर, सुनील नागशेट्टीवार, राजेंद्र इंगळे, युवा व असंख्य शिवसैनिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.