
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळा आडगाव येथे पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळा आडगाव व शालेय शिक्षण समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले व तसेच यावर्षी बारावी मध्ये विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील शिक्षणप्रेमी व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार बालाजी धनसडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की गावातील प्रत्येक तरुणाने आपला वाढदिवस आपल्या शाळेत काही नवीन उपक्रम राबवून साजरा करावा त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल असेच सर्वांनी उपक्रम राबवावे असे ते म्हणाले .
यावेळी केंद्रप्रमुख साहेब, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी,गावातील नवनिर्वाचित चेअरमन मुरलीधर क्षीरसागर व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील क्षीरसागर,सदस्य विष्णू धनसडे, विकास पाटील क्षीरसागर शालेय व्यवस्थापन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील क्षीरसागर ,सदस्य मेघराज क्षीरसागर प्रतिष्ठित नागरिक गंगाधर मामा भालके पाटील क्षीरसागर भगवान पाटील क्षीरसागर पांडुरंग पाटील क्षीरसागर