
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:- अनंता टोपले
मोखाडा:- समाजातील गरजू व गरीब जनतेला कोणत्याही परिस्थितीत रक्ताची कमतरता येऊ नये म्हणून आरोहण संस्था व कुटीर रुग्णालय जव्हार {महाराष्ट्र शासन } यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी शैक्षणिक, प्रशासकीय,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपले रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे,त्याच प्रमाणे आरोहण कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यानी ही आपले रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम ,आरोहण संस्थेचे संचालक अमित नारकर सर नितेश मुकणे,कौस्तुभ घरत,व आरोहण च्या प्रोजेक्ट ऑफिसर तमन्ना सय्यद मॅडम,रंजना जोशी मॅडम,बालाजी परसूटकर व आरोहण चें कार्यकर्ते व कुटीर रुग्णालय जव्हार येथील आरोग्य पदाधिकारी उपस्थित इत्यादी उपस्थित होते.