
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पुणे: कर्जत येथे एमबीसीपीआर संस्थेच्या वतीने दीपोत्सव करण्यात आला.संस्थेच्या वतीने महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळ्या बुद्ध लेण्यांमध्ये दीपोत्सव करण्यात येतो. बुद्ध धंम्मा मध्ये बारा ही पौर्णिमेचे खूप मोठे महत्त्व आहे. त्याच कारणाने कोंढाणे बुद्ध लेणी येथील मुख्य चैत्यगृहात व लेणीच्या बाहेर सुमारे ३०० दीप लावून दीपोत्सव करण्यात आला. या बुद्ध लेणीतील चैत्यगृहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या लेणी मध्ये लेणीच्या निर्मितीपासून दीपोत्सव करण्यात येत होता व हे दीप ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्या पद्धतीचे नियोजन केले होते. अशा लेणी स्थापत्या मध्ये निपून असणार्या त्या अनामिक कलाकारांचे काम खूपच प्रशंसनीय व अविस्मरणीय आहे.असे संस्थेचे समन्वय मनोज गजभार यांनी सांगितले. हा दीपोत्सव करत असताना ही कोंढाणे बुद्ध लेणी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेली होती व चैत्यगृह दिव्यांच्या प्रकाशाने खूपच सुंदर दिसत होता आणि त्या प्राचीन काळी दीपोत्सव केल्यानंतर या लेणीच्या सौंदर्या मध्ये किती भर पडत असेल हा अनुभव देखील येत होता.
या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. या वेळी पूज्य भन्ते संघरत्न औरंगाबाद प्रभाकर जोगदंड लेणी अभ्यासक संस्थेचे सागर कांबळे बोधिसत्व चॅनलचे संचालक मनोज गजभार लेणी संवर्धक आशिष भोसले, आनंद खरात, कदम ,निकेतन सावंत, सिध्दार्थ आहिरे, सिद्धार्थ सोनवणे, सुनिल नागवंशी,जितेंद्र नरवडे या वेळी उपस्थित होते. या दीपोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पुणे मुंबई येथील आलेल्या लेणी संवर्धकांनी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळातील पोषाख परिधान केला होता. या पोषाखा मध्ये असे वाटत होते की, आपण या बुद्ध लेण्यांच्या निर्मितीच्या काळामध्ये गेलो आहोत की काय? हा अनुभवही अविस्मरणीय दिसून आला. प्रभाकर जोगदंड यांनी हे पोशाख आणल्या मुळेच आम्हालाही त्या काळात गेल्याचा अनुभव आल्याचे लेणी संवर्धकांनी सांगितले. त्यामुळे प्रभाकर जोगदंड यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.