
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलिसवाडी तालुका लोहा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा निमित्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री.पिराजी नागोराव धुळगुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.विठ्ठल कवडे माजी उपसरपंच श्री.संग्राम हाके,शा.व्य.समिती सदस्य श्री.ज्ञानेश्वर पोले, श्री.शंकर पोले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी सौ.बडे मॅडम उपस्थित होते.व गावातील पालक, शिक्षण प्रेमी नागरिक श्री.सिद्धेश्वर पोले, गणेश धुळगंडे,माधव कंधारे, राहुल बाजगीर, सिद्धेश्वर फुगनर, संदिप पोले,हाणमंत पोले, मारोती मदने तसेच आदी नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.एस. आर.गायकवाड यांनी केले प्रथमता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांसोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली पहिली प्रवेश घेणाऱ्या मुलांचे टोपी व हार गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन त्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विविध प्रकारचे खेळ व अनेक उपक्रमांचे आयोजन करून शाळेत येणाऱ्या नवीन मुलांना उत्साह वाटावा व त्या मुलांचे मनोरंजन व्हावे यासाठी उपक्रमांचे आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर बडे मॅडम यांनी आपले विचार मांडले व कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात श्री.पिराजी धुळगंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड एस. आर. नागेश स्वामी श्री. मारुती केंद्रे, सौ.ज्योती सरोदे, सौ.वर्षाबाई सलगर, श्री. विठ्ठल जालने यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केंद्रे सर यांनी केले तर आभार श्री.जालने सर यांनी मानले.