
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-किशोर वाकोडे
बुलडाणा: दि.१६. अनेक वर्षांपासून मिलींद नगर येथे महाकवी वामनदादा कर्डक व लोककवी प्रतापसिंगदादा बोदडे यांचा लाभलेला सहवास त्या अनुषंगाने मिलींद नगर वासियांकडून व वंचित बहुजन आघाडी बुलडाणा शहर शाखेच्या विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दि. १८/०६/२०२२ शनिवारला सायं ठीक ६.३०वाजता वामनदादा कर्डक सभागृह मिलिंद नगर, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर सुखदेवराव जाधव हे असून प्रमुख उपस्तिथी म्हणून शाहीर डी.आर.इंगळे, शाहीर वा.का.दाभाडे, निरंजन वानखडे(वस्ताद) तसेच विशेष उपस्थिती म्हणून सर्व कलावंत मंडळी व आंबेडकरी चळवळीतील कलाप्रेमी राहणार आहेत.
अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी शाहीर मेघानंद जाधव औरंगाबाद यांचा बुद्ध-भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी बुलडाणा शहर, तालुका व जिल्ह्यातील सर्व कलावंतांनी व कलाप्रेमींनी तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व जनतेस उपरोक्त अभिवादन कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी बुलडाणा शहर अध्यक्ष व निमंत्रक मिलिंद वानखडे यांनी केले आहे.