
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथे आधुनिक कौशल्या ट्रामा केअर ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन मंहत प.पु. येलेराज बाबा पालमकर यांनी लोहा येथील आधुनिक सोयी सुविधा युक्त कौशल्या ट्रामा केअर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करतेवेळी केले.
लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर नानानगर येथे आज दिनांक १६-६-२०१६ रोजी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या आधुनिक कौशल्या ट्रामा केअर अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य शुभारंभ करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून मंहत प.पु.येलेराज बाबा पालमकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, माजी पाणी पुरवठा सभापती आप्पाराव पाटील पवार, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, हळदवचे सरपंच प्रल्हाद पाटील वडजे, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, ज्ञानोबा हनवंते, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शिंदे, भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष बंडू पाटील वडजे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंहत प.पु. येलेराज बाबा पालमकर म्हणाले की, संत परमस्कार सांगतात. हिवाळ्यात आमची गुरू माऊली ९५ वर्षांची आजारी पडली होती तिला लोहा येथील पवार हॉस्पिटल येथे दाखल केले होते डॉ. पवार यांनी तिच्यावर चांगला उपचार केला नांदेडला जाऊ दिले नाही १० हजार रुपये फी कमी केली.तसेच तुम्ही कौशल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करा रुग्णांचा स्वस्तात इलाज करा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे तुमच्या कडून जनसेवा घडत राहो कौशल्या हॉस्पिटलच्या सर्व डाॅक्टरांना महाराष्ट्रातील सर्व संत महंत यांच्या वतीने शुभेच्छा देतो प्रेरणा देतो असे महंत प.पु. येलेराज बाबा पालमकर म्हणाले.
तसेच यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार ,उपाध्यक्ष दत्ता वाले, ज्ञानोबा पाटील पवार,लोहा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बारी, नांदेडचे उमेदवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन पाटील उमरेकर , डॉ. प्रमोद पाटील चिखलीकर, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. घंटे , डॉ. किलजे, संजय मोटे, आदीने शुभेच्छा दिल्या.
यावेळी कौशल्या हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर डॉ. हर्षवर्धन टेळकीकर ( एमबीबीएस,डी आॅर्थो), डॉ. विजया गायकवाड ( बी.ए. एम.एस.), डॉ. विशाल पानशेवडीकर (एमबीबीएस एम.एस. सर्जन) डॉ. क्रांती शिलेदार ( एमबीबीएस, आॅर्थो) डॉ. दिपक मोहिते , डॉ. लोहारे, श्री पंचकृष्णा मेडिकलचे गोपाळ पाटील पवार, रंगनाथ पा.पवार, आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जोगदंड, विनोद सुर्यवंशी , सिध्दार्थ ससाणे, संतोष बगाडे,वेंदात पवार,श्रीधर पवार,मोहन पवार आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लोहारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मन्मथ स्वामी यांनी केले व आभार गोपाळ पाटील पवार यांनी मानले.