
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
सोहळा म्हणजे सण… सण म्हणजे उत्साह , आनंदाचे उधान, मौजमजेचे हौसेचे हाती घेतलेल्या संकल्पाचे, कार्याचे पारणे , सुसंस्कृत परंपरेच्या प्रथा रिवाजांची उजळणी.. संपुर्ण वर्षातील नित्य नियमाने अरुणोदय होणाऱ्या दिना पेक्षा किंचितसा आगळावेगळा आनंदसागराच्या लाटेवर स्वार होउन आगमन होणारा चैतन्य दिन म्हणजेच सण.. आणि हा साजरा करण्याच्या अन त्या आनंदमय वातावरणात देहभान विसरुन एकरुप होउन साजरे करण्याचा आरंभ म्हणजेच समारंभ होय… आपण खरोखरच किती भाग्यवान आहोत की आपण भारतात जन्मलोय जेथे सण सोहळे संमारंभ जल्लोषात साजरी करण्याची परंपरा आहे… सण सोहळ्याच्या निमित्तानेच आपण जुने वैर मतभेद जुने वाद दुर सारुन व जुने गमावलेले मित्र एकत्र येउन पुनः गळ्यात गळा घालुन ऐक्याचा संदेश देउ शकतो… सण सोहळे हे एक निमित्तच असतं आपल्या सर्वांना कुण्या निमित्ताचीच अपेक्षा असते व आपण सर्व निमित्तांची अतुरतेनं अपेक्षा करत असतो… असंच एक निमित्त होतं .. आपल्या रेखाचित्र संघटनेच्या ४७ व्या वर्धापन दिनाचं…. दिनांक १२ जुन २०२२ संघटना शासन मान्यतेचा वाढदिवस अवघ्या सात आठ दिवसा नजीक आलेला होता.. मागील चार वर्षांपासून औरंगाबाद व जालना जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्षा व त्यांचे जिल्हा पदाधिकारी हे दरवर्षी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा एका सणाप्रमाणेच साजरा करीत आले.. संघटना ४७ वर्षाची झाली ..तसे संघटनेची उभारणी ,रचना बांधणी तथा स्थापना हि सन १९७२ लाच झालेली होती परंतु या संघटनेला शासनदरबारी रितसर नोंदणीसह शासन मान्यता सन १९७५ ला मिळाली आणि १२ जुन १९७५ हा दिन आपल्या दृष्टीने संघटनेचा अधिकृत वर्धापन दिन मानण्यात येतो.. संघटनेचा वाढदिवस येतोय संघटना सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे… या औचित्याने औरंगाबाद जिल्हा शाखा जवळपास पंधरा दिवसापासुनच हा वर्धापन दिन आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या तयारीत होते… साहजिकच हा सोहळा आगळा वेगळा कसा करावा या साठी जिल्हा कार्यकारीणीने मला व केंद्रीय अध्यक्षांना विचारले आम्हीही त्यांना नियोजनाबद्दल काही टिप्स दिल्या … आणि जिल्हाशाखेचे सगळेच पदाधिकारी व सभासद कंबर कसून नियोजनाला लागले… जिल्हाध्यक्षा सौ.विणा ठाकुर यांनी मला मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेंव्हा मी त्यांना सरळ सरळ नुकत्याच झालेल्या अभुतपूर्व नागपूर सर्वसाधारण सभेला समोर ठेउन प्रयत्न करा म्हणजे आपोआप तुम्हाला कशाप्रकारे नियोजन करावे याची कल्पना येईल असाच सल्ला दिला… जिल्हाशाखेची बैठक होउन तयारी सुरु झाली व यात औरंगाबाद जालना जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तांचा सत्कार करावा व सन्मानपत्र प्रदान करावे हे ठरले..हाच महत्वाचा मुद्दा धरुन जसे नागपूरला मा.संस्था.अध्यक्ष श्री संभाजी रायपूरे साहेबांचा गौरव झाला तसाच संघटनेचे जेष्ठ माजी सरचिटणिस श्री ह.ब.काझी साहेबांना सन्मानित करावे असे ठरले.. याच दरम्यान संघटनेचे माजी कार्याध्यक्ष श्री सुनिल सुर्वे अलोरे,रत्नागिरी यांचा मला,जाफरी सरांना वैयक्तिक फोन आला व मी या महिण्यात सेवा निवृत्त होत आहे व माझ्या सेवा निवृत्ती कार्यक्रमासाठी आपण यावे असे आम्हाला निमंत्रण दिले..आमचे जाणे शक्यच नव्हते आणि औरंगाबाद जिल्हा शाखेचा वर्धापन सोहळा जल्लोषात साजरा करायचे ठरले होते या कार्यक्रमासाठी आपणच औरंगाबाद ला यावे असे मी सुर्वेंना सहजगत्या म्हंटले.. त्यांनी काहीतरी कारण सांगुन बघु या म्हंटले असो तदनंतर जिल्हाध्यक्ष ,केंद्रीय अध्यक्ष यांचे सह याच विषयावर चर्चा झाली तेंव्हा कार्यक्रमात कार्यक्रम म्हणुन श्री सुर्वेचा निरोप समारंभ साजरा करायला काय हरकत आणेशा कार्यक्रम होत आहे हे जाणुन पुनः श्री सुर्वेंना कळवले ते ही तयार झाले ..आता प्रमुख पाहुण्यांचा शोध म्हणुन गोदावरी महामंडळाचे अधिक्षक अभियंता श्री मनोज अवलगावकर साहेब यांची भेट ठाकुर मॕडम व जाफरी सरांनी घेतली जाफरी सरांचे अवलगावकर साहेबांशी अगदी निकटचे संबंध आहेत तसेच अवलगावकर साहेबांकडे परिमंडळाचा अधिकृत चार्ज होता आणि त्यांनीच पदोन्नतीचे आदेश काढले म्हणुन त्यांनाच बोलवायचे ठरले तेही आनंदाने तयार झाले सोबत अतिशय प्रसिद्ध डॕशिंग स्वभावाचे औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अनिल निंभोरे साहेब ,श्री जयवंतराव गायकवाड उप वि.अभि. व माजी महाराष्ट्र कनिष्ठ अभियंता संघटना अध्यक्ष तसेच श्री वसंत मनोरकर आस्थापनाचे जाणकार या सर्वांनी व्यासपिठाचे स्थान स्विकारले.. कार्यक्रमाची लगबग सुरु झाली जिल्हा शाखेचा कार्यक्रम होता तसा इतर सर्व जिल्ह्यातही तो साजरा होईलच परंतु औपचारीकता म्हणुन औरंगाबाद जिल्हाशाखेने सर्व केंद्रीय पदाधिकार्यांनाही संदेश व फोन केले… दिनांक १२ जुन चा दिवस उजाडला … तयारी सुरु झाली ..मंच सजावट झाली..सत्कार भोजन रांगोळी नियोजन सर्वकाही सुरळीत करण्यासाठी जिल्हा कार्यकारीणी झटत होते .. सिंचन भवनातील भव्य सर विश्वेश्वरय्या हॉलचे तात्पुरते औरंगाबाद जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व सर्वांचे संघटन गुरु स्व.श्री रावसाहेब धस सभागृह असे नामकरण केले.. सकाळी दहा वाजे पासुनच सभासदांचे आगमन सुरु झाले… सभासदांच्या रितसर नोंदणी होत होत्या अगदी पंधरा वर्षापुर्वीचे ते आताच सेवा निवृत्त सदस्य कार्यक्रमासाठी येत होते ..बघता बघता शंभरावर संख्या गेली अनपेक्षित वाढती संख्या पाहुन उत्साह वाढत होता..अनेक वर्षानंतर काही सदस्य सहकारी मित्र एकमेकांना भेटत होते एक वेगळेच वातावरण निर्माण झाले…सर्व सभागृह सजले अन सभासद गणांच्या उपस्थितीने फुलले होते…प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताना संगीत ताल व सभासदांचा जल्लोष पाहुन प्रमुख पाहुणे अधिकारीही विस्मित जाहले.. श्री काझी साहेबांची एंट्री होत असताना जल्लोष पाहुन तर काझी साहेब पार भांबाहून गेले या अपुर्व आनंदामुळे आतापर्यंत त्यांनी मला व अध्यक्षांना दोन तीन वेळा फोन करुन बोलून दाखवले… श्री कसबे या कसलेल्या सेवानिवृत्त कलाकार सभासदाने सुंदरशी गीते सादर करुन सभासदांचे मनोरंजन तर केलेच पण स्वागतगीत गाउन पाहुण्यांना आनंदीत केले..दिप प्रज्वलन चे सोपस्कार झाले प्रास्ताविक जिल्हासचिव श्री एस एम नाईक यांनी सादर केले.. सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ….आपल्या दिवंगत झालेल्या सहकार्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..या सर्व सोपस्कारानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संघटनेचे माजी सरचिटणीस जेष्ठ मार्गदर्शक संघटन कार्यशैलीचे मापदंड असणारे आदरणिय श्री ह.ब .काझी साहेब नाशिक यांचा जिवन गौरव सन्मान व सत्कार करण्यात येउन त्यांना संघटनेच्या वतीने सन्मान पत्र प्रदान करण्यात आले… तदवतच संघटनेचे माजी कार्याध्यक्ष श्री सुनिल सुर्वे साहेब यांचांही सन्मान पत्र देउन त्यांच्या संघटन कार्याबद्दल तथा सेवानिवृत्तीच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला…हे सर्व शिस्तीने चालु असताना येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढतच होती जवळपास दिडशेच्यावर सदस्य सभागृहात जमले बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या सत्कार कार्यक्रम झाला पाहुण्यांची अतिशय अभ्यासपुर्ण व मार्गदर्शक भाषणे झाली..हा सोहळा पाहुन त्यांनी रेखाचित्र संघटनेचे आश्चर्यचकित होउन खुप कौतुक केले… या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य असे की या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर व्यक्तीमत्वातील ,आवाजातील ,विनोद,प्रासंगीक तसेच काव्य, हास्य व सहज सुंदर शब्दबाण शब्दसुमन सादरीकरणासह संपुर्ण कार्यक्रमाला सुनियोजित सुरळीत लाभलेले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन… एखाद्या भव्य दिव्य साहित्य संम्मेलन किंवा फिल्मफेअर ॲवार्ड च्या सुत्र संचलन सादरीकरणाप्रमाणे संघटनेच्या एक महिला सभासद श्रीमती दिपाली खोबरे भुजल सर्वेक्षण विभाग औरंगाबाद यांनी केले..त्यांच्या सुत्रसंचलनाने संपुर्ण कार्यक्रम रंगतदार तर झालाच पण सर्व उपस्थित सभासदांंना सभागृहात खिळवून ठेवले…मध्यंतर झाला आता भोजनावकाश ..अतिशय सुंदर रुचकर असे सुरुची भोजनाचा आस्वाद घेताना सर्व सभासद तृप्त झाल्याचे दिसत होते.. प्रमुख पाहुण्यांनीही भोजनाचा आस्वाद घेउन भोजन व्यवस्थेचे तोंडभरुन कौतुक केले…दुसऱ्या सत्रात उपस्थित सर्व सेवानिवृत्त सभासद तसेच पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवर पाहुण्याच्या हस्ते सकार करुन त्यांना सन्मानपत्र तसेच एक वृक्ष रोपटे देउन सन्मानित केले या सभासदांच्या उपस्थितीत काही ८५ वर्षाहुन जेष्ठ सभासद होते हा सोहळा पाहुन ते ही धन्य झाले… पदाधिकारी ,उपस्थित सभासद तसेच मान्यवर पाहुण्यांच्या मनोगतांनी संपुर्ण रेखाचित्र संघटनेच्या इतिहासाचे वर्णन व रेखाचित्र शाखेच्या कार्याचा उल्लेख झाल्याने सर्व वातावरणात भुत वर्तमान व भविष्यकाळाच्या रेखाचित्र कार्याच्या प्रवासाचे चित्र रंगले… सर्व आजी माजी उपस्थित सभासदांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक चकाकी तरळत होती अभिमानाने सर्वांचा उर भरुन आलेला दिसत होता ..हेच या वर्धापन दिनाचे यश होते औरंगाबाद जिल्हाशाखेने एक अभुतपुर्व सोहळा घडवुन आणला व जिल्ह्यातील सर्व रेखाचित्र संवर्गाला एक स्वर्गीय आनंद मिळवून दिला…संघटनेच्या येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची हि झलक दिसत होती ..जिल्हा शाखेतील पदाधिकार्यांनी खुप परिश्रम व कल्पनाशक्ती घेउन हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व पदाधिकार्यांचे कितीही कौतुक केले ते कमीच होईल.. मी व मा.जाफरी सर आम्हा दोघांनाही पाहुणे म्हणुन आमंत्रित केले व्यासपीठावर बसण्याचा सन्मान दिला हे आमचे अहोभाग्यच.. त्या बद्दल जिल्हा शाखेचे आभार.. केंद्रीय महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती डोकबाणे या माझ्या वैयक्तिक विनंतीला मान देउन कार्यक्रमासाठी खास नाशिकहुन आल्या व जिल्हा शाखेत समरस होउन जिल्हा पदाधिकार्याप्रमाणे झटुन रांगोळी काढणे व्यासपीठावरील व्यवस्था सारख्या सर्व कामात मदत केली तसेच मा.श्री काझी साहेबांचा जिवनप्रवास परिचय सादर करुन उपस्थित सभासदांना काझी साहेबांच्या संघटन कार्याची माहीती सादर केली… सकाळी अकरा वाजता सुरु झालेला कार्यक्रम हा सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही साध्या गोंधळाविणा अतिशय शांततेत कुठेही कंटाळवाणा न वाटणारा असाच झाला… संपुर्ण कार्यक्रमासाठी येणारा खर्च माफक असावा अनावश्यक खर्च होउ नये… कार्यक्रमात वाद उदभवू नये ..सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण रहावे याची कटाक्षाने दक्षता घेतल्याचे दिसुन येत होती…. सायंकाळचे पाच वाजले होते कार्यक्रम आटोपत आलेला होता..भाषणे ,मनोगते.मधुन मधुन होणारी चर्चा ,सभासदांचा उत्साह ,परस्परांशी ओढ ,संघटनेवरील प्रेम निष्ठा अभिमान या सर्व कारणाने धमाल उडवून दिली …धन्य हि आपली संघटना ..धन्य आपला रेखाचित्र संवर्ग आणि धन्य आपले शहर जेथे या संघटनेचा जन्म झाला अन संघनेचा ४७ वा वाढदिवस इतक्या जोषपूर्ण वातावरणात साजरा झाला… संपुर्ण दिवसभर आपल्या गोड सुंदर आवाजात सुत्रसंचलन करणाऱ्या दिपाली खोबरे ताईनेच या जोषपूर्ण कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सादर करुन राष्ट्रगीतासह या असामान्य अदभुत आनंददायी न भुतो न भविष्यती अशा कार्यक्रमाला पुर्ण विराम दिला…. धन्य जाहलो आम्ही..आमुची संघटना मातेनं ४८ व्या वर्षात पदार्पन केले.. धन्य आजचा दिन… हा वर्धापन दिन अनंतकाळ चिरायु होवो…. जय महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना…
वृत्तांकन ..राजेंद्र करपे / केंद्रीय प्रमुख सल्लागार .. स्व.रावसाहेब धस सभागृहातुन..