
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संजय(नाना) गाढवे प्रतिष्ठान च्या वतीने रविवार दि.१९ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील सर्व शाळांमध्ये व महाविद्यालयात सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी,बारावीतील परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा,इयत्ता दहावी,बारावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ शहरातील व्यापारी,प्रतिष्ठित नागरिक,सर्व शाळांचे संस्थाचालक,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आदि.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या सत्कार सोहळ्यास शहरातील सर्व नागरिक,जेष्ठ नागरिक,विद्यार्थी,महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संजय (नाना) गाढवे प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.