
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर -हनमंत शिरामे
कलंबर :- संजय गांधी हायस्कूल कलंबर ता. लोहा जि. नांदेड एस. एस. सी. परीक्षेत प्रथम येण्याचा मान दोन विद्यार्थ्यांना मिळाला. जायनुरे प्रतिक्षा माधव ९०.६०% व हिप्परगे मंगल बालाजी ९०.६०% व्दितीय करडे दुर्गा रघुनाथराव ८९.८०% तिसरा गोरे ओंकार आनंदा ८८.८० येऊन शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती मुद्रिकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड,संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतीराव पाटील घोरबांड, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मामडे साहेब, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी दहावी पास झालेल्या व प्रथम , व्दितीय, तिसरा येणाऱ्या विद्यार्थाचे अभिनंदन केले आहे व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.