
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दिनांक 17 जून 2022,ता. प्र.
अर्धापूर येथील महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय या शाळेने मागील 12 वर्षापासून आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत याहीवर्षी दहावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल लावून तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावलौकिक कायम ठेवला आहे.
शाळेतील एकूण 58 विद्यार्थी दहावी परीक्षेस प्रविष्ट होते. यापैकी 28 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर 28 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. 02 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन शाळेने 100% निकाल दिला आहे. याबद्दल शाळेचे सचिव पंडीतराव लंगडे, अध्यक्ष मुंजाजी लंगडे, उपाध्यक्ष बालासाहेब शेटे, मुख्याध्यापक आर.पी. बिरादार (शैलजा शेटे)मॅडम, शाळेतील शिक्षक विजय दुगावकर, वैशाली शिंदे, नानासाहेब पवार ,संतोष पिंपरे,शिवकुमार शेटे, सेवक नवनाथ ढगे,संदीप वाघमारे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळेचे सर्व स्टाफ चे विशेष अभिनंदन संजय लहानकर, प्रा.डॉ. रघुनाथ शेटे ,डॉ.विशाल लंगडे,नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,राजू शेटे,,कांता मुळे, गुणवंत वीरकर,आर.आर.देशमुख, ,सोनाजी सरोदे,व्यंकटी राऊत,यांनी अभिनंदन केले. यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे