
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुखेड -संघरक्षित गायकवाड
मुखेड:दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाचा उत्तुंग आलेख आणि यश व ध्येयप्राप्तीची वाटचाल करण्यासाठी आदरणीय माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांचे मार्गदर्शन आणि आदर्श विद्यालयाची मेहनत आज फळाला आली.
आम्ही करतो पालकांची व विद्यार्थ्यांची स्वप्नांपूर्ती आणि त्यांना मूर्तरूप प्राप्त करून देण्यासाठी घेतो ती मेहनत. यामुळेच वर्षानुवर्ष आदर्श विद्यालयाचा यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतांना दिसतोय.
आजच्या या निकालात एकूण ३० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत क्षमता सिद्ध करत अकाशाला गवसणी घातली आहे. या निकालात एकूण ३० पैकी २०विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह(८०%च्या वर) उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. आदर्श विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
गुणवंत विद्यार्थी:-
१)कु.स्वामी शिवकांता गंगाधर
प्रथम(८७.६०%)
२)कु.साखरे मनीषा रघुनाथ
व्दितीय(८७.२०%)
३)कु. दिंडे प्रियांका तेजेराव तृतीय(८७.००%)
४)कु.पांचाळ वैष्णवी अविनाश
तृतीय(८७.००%)
५)कु. गायकवाड श्वेता हुल्लाजी
चतुर्थ(८६.४०)
सर्व गुणवंत, यशवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, मुख्याध्यापक मा.श्री संजय पाटील सर, शाळेचे शिक्षकवृंद श्री वाडेकर सर, श्री.स्वामी सर,श्री.शेख सर, श्री मंगनाळे सर, श्री.तमशेट्टे सर,श्री.सोनकांबळे सर, कलेपवार सर, खंडागळे सर(लिपिक) श्री.पाटील सर, राम पाटील, व सर्व स्टाफने गुणवंताचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालिस खूप खूप शुभेच्छा दिल्या.