
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कापसी(बु.) :- लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील सरपंच श्री. संतोष पाटील जाधव यांच्या मुलीने एस. एस. सी. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिने ग्रामीण भागातून जास्त मार्क घेऊन ऊचांक संपादित केला आहे.कापसी (बु.)येथील श्री. बाळगीर महाराज विद्यालयातून शिक्षण पुर्ण केले आहे. तिने ९२.२०% टक्के घेऊन पास झाली आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेतील गुरुजन व आप्तेष्टांनी तिचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यात यशस्वीपणे पूर्ण करावे अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.