
दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार
काल जामा मस्जिद देवळघाट येथे मुस्लिम समाजातील युवकांच्या वतीने मस्जिद ईद मिलन व मस्जिद परचीय कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यात गावातील व सर्व शासकीय कर्मचारी ,राजकीय पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी दर्यापूर येथील मुफ्ती शकीक साहेब व मुफ्ती जुनेद साहेब यांनी मार्गदर्शन केले.या कार्यकर्म मध्ये सर्वाना अजानच्या काय अर्थ नमाज कशी पठण केली जाते हे पण दाखवण्यात आले.
या कार्यक्रमात बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम बुलडाणा ग्रामीण ठाणेदार रवींद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य डी एस लहाने , PSI सोनकांबळे ,बाळा साहेब देशमुख ,दत्ता काकस,बिट जमादार सुनील हिवाळे,ग्रामविकास अधिकारी देशमुख, तलाठी काळूसे,मदन सेठ,पत्रकार दीपक मोरे , प्रशांत सोनोने ,सुनील तायडे, बाळू भराड, गजानन देशमुख व गावकरी मंडळी उपस्थित होते .
या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व उलमा ए इकराम व युवकांना परीश्रम घेतले.