
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
———————————————
आ. बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे मानले आभार
——————————–
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातील तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील विविध रस्ते राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत केल्याबद्दल नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
नांदेड – उत्तर मतदार संघाचे आ. बालाजी कल्याणकर यांनी अनेक दिवसांपासून नांदेड उत्तर मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्ग हे राज्य मार्ग तसेच जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्न्त व्हावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून 8 जून रोजी व 14 जून रोजी शासनाने परिपत्रक काढून नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते हे राज्य मार्ग तसेच जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्न्त केले आहेत. यामुळे आ. बालाजी कल्याणकर यांचे जिल्ह्यात सर्वत्र आभार मानले जात आहेत.
या परिपत्रकात राज्यमार्ग 61 पासून हिवरा-परभणी जिल्हा सीमा तळणी – खडकी – मरळक बु. पावडेवाडी – सुगाव खु. – सुगाव बु.- कोटीतीर्थ – थुगाव – बोरगाव तेलंग ते प्रजिमा – 84 पर्यंत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्न्त झालेला आहे. तसेच नांदेड हिंगोली जिल्ह्यातील वसमत ते अर्धापूर नांदेड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते राज्य मार्ग म्हणून दर्जोन्न्त करण्याबाबत अनेक दिवसापासून नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शासनाने 8 जून रोजी परिपत्रक काढून राममा – 752 आय पासून अंबा चोंडी कुरुंदा टोकादेवी गिरगाव मालेगाव पासदगाव तरोडानाका शिवमंदिर तरोडा बु. शेलगाव दाभड ते राममा 361 पर्यंत रस्ता हा प्रमुख राज्य मार्ग म्हणून केला आहे. तसेच यावेळी उत्तर मतदारसंघातील जिल्हा मार्ग रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्न्त देखील झाले आहेत. यात राज्यमार्ग 61 पासून परभणी हिवरा – परभणी – जिल्हा सीमा तळणी – खडकी – मरळक बु. पावडेवाडी – सुगाव खु. – सुगाव बु. – कोटीतीर्थ – थुगाव – बोरगांव तेलंग ते प्रजिमा – 84 पर्यंत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्न्त झालेला आहे.