
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार – श्री संत साधू महाराज खंदारकर संस्थांन यांची सातशे वर्षापासून पंढरपूराकडे पायी जाणारी दिंडी याही वर्षी संस्थानचे सातवे वंशज मठाधिपती गुरुवर्य ह. भ. प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली २१ जुनला पंढरपूराकडे प्रस्थान करणार आहे.
कंधार ते पंढरपूर हे अंतर जवळपास साडेतीनशे कि. मी. आहे. सदर अंतर पंधरा दिवसांत पायी चालत कापले जाते. प्रतिदिन दहा ते पंधरा किलोमीटर अंतर. माउलीचे नामस्मरणाने पार केले जाते.प्रत्येक दिवशी सुरू होणारा हया पायी प्रवासात वारकऱ्यांची चहा, पाणी, नाष्टा, जेवणाची व्यवस्था दरम्यान असलेल्या गावातील भक्तांतर्फे होते. रात्रीचे भव्यदिव्य किर्तन होते. रात्रीचा आराम झाला त्या गावचे वारकरी या दिंडीत सहभागी होतात व पुढे दिंडी मार्गस्थ होते.प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्थानचे सातवे वंशज मठाधिपती श्री. ह. भ. प. एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली सकाळी बारा वाजता दिंडी कंधार, लोहा,माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकुर, घरणी,भातखेडा, लातुर, साकरा, बोरगाव, मुरूड,ढवळाला, तडवळे, येडसी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुर्डूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव, पंढरपूर अशी मार्गस्थ होणार आहे. हि दिंडी पंढरपूरात आषाढ शुद्ध. आष्टमी ८ ( ७ जुलै) रोजी पंढरपूरात पोहचणार आहे.ह्या दिंडीत ज्ञानेश्वर साधू महाराज, नरसिंग करेवाड, मारोतराव येईलवाड,श्रीराम करेवाड, संदीप महाराज आलेगांवकर, एकनाथ गोटमवाड, गंगाधर कावडे, आरूण येईलवाड,माने साहेब दिंडीचे नियोजन करतात. ज्यांना दिंडीत सहभागी व्हायचे त्यांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करावे व दोन्ही लस घेणे अनिवार्य असणार आहे.ज्यांना दिंडीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क प्रमुख श्रीराम करेवाड(८३२९२६९४३२), संदिप महाराज आलेगांवकर(९६६५७११५१३) यांच्याशी संपर्क साधावा असे साधू महाराज संस्थान तर्फे कळविण्यात आले आहे.