
दैनिक चालू वार्ता मोलगी प्रतिनिधी -रविंद्र पाडवी
मोलगी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या मार्फत वृक्षारोपण सप्ताहानिमित्त शासकीय आदिवासी आश्रम शाळा भांगरापाणी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मुख्याधयापक पी.टी.वसावे यांंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले वने असलेल्या ठिकाणी अतिक्रमणे केली जात आहेत. येत्या काळात परिस्थिती बिकट होणार आहे. काही दिवसात सगळी माती वाहून जाऊन वाळवंटीकरण होईल. यात सर्वात मोठे नुकसान त्या भागातील आदिवासींचेच होईल. शेतीलायक जमीन राहणार नाही; परिणामी लोकांना स्थलांतर करावे लागेल.
रामदास सोनार यांनी देखिल पूर्वी लोकं घरे बांधण्यासाठी लाकडे सातपुड्यातून खाली शहरात न्यायची आता याच्या उलट झाले आहे. आता शहादा तळोदा हून लोकं (सागवान राहिले नाही त्यामुळे निलगिरी ची) लाकडे घेऊन वरती घेऊन जात आहेत असे त्यांनी सांगितले .
बार्टीचे धडगांव अक्कलकुवा तालुका समतादूत ब्रिजलाल पाडवी बोलताना सांगितले की जोपर्यंत स्थानिक लोकांचे सहकार्य मिळत नाही, जोपर्यंत स्थानिक लोकं वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करत नाहीत, तोपर्यंत हे शक्य नाही. ”
याबाबत मी सहमत आहे. कोणतीही योजना स्थानिकांच्या सहभाग व सहकार्याशिवाय यशस्वी होत नाही.म्हणून सातपुड्यातील तमाम बांधवांना माझी विनंती आहे की, उठसूट वृक्षतोड करून आपले अस्तित्व धोक्यात टाकू नका. सर्व गावकऱ्यांनी मिळून कुऱ्हाड बंदी चा निर्णय घेऊन लाकडांचा अवैध व्यापार बंद करावा व प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे एक तरी झाड जगवण्यासाठी प्रयत्न करा.आताच बघा जून महिना निघून गेला तरी पाऊस व्यवस्थित पडलेला नाही. पुढिल स्थिती आणखीन बिकट होणार आहे. स्वतःपुरता विचार करू नका, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करायला हवा कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत पाडवी शिक्षक, विद्यार्थ्यांनी , सह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.