
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम :-तालुक्याची शिवसेना युवा सेना व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह याठिकाणी पार पडली.
या बैठकीला भूम परांडा वाशी विधानसभा संपर्कप्रमुख संजयजी नटे उपस्थित होते.
विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी बंडखोरी जरी केली असली तरी शिवसेना ही कायम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व मतदार संघातील तमाम शिवसैनिक युवा सैनिक हा त्यांच्या नेतृत्वावर कायम विश्वास ठेवत राहील असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके सर यांनी व्यक्त केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकीमध्ये शिवसेनेची आणखीनच ताकद वाढेल व शिवसेनेचा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला हा कायमस्वरूपी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील असे मत युवा सेना जिल्हाआधिकारी डॉ . चेतन बोराडे यांनी व्यक्त केले.
विद्यमान आमदारांनी जरी बंडखोरी केलेली असली तरी मतदारसंघातील शिवसैनिक व युवासैनिक हा आपल्या जागेवर कायम आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे विधानसभेचे संपर्कप्रमुख श्री संजयजी नटे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमूख गौतम लटके , शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज,महिला आघाडी शहर संघटक उमाताई रणदिवे, सुनील माळी, श्रीनिवास जाधवर, केशव नाना चव्हाण,युवा सेनेचे प्रल्हाद आडागळे,दत्तात्रेय असलकर , शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख महादेव बाप्पा वारे,गणेश दुरुंदे जयराम गायकवाड,युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर ढगे, जावेद तांबोळी,रफिक तांबोळी, लक्ष्मण नाईक,भरत सुरवसे,अविनाश जाधव लक्ष्मण नागरगोजे,प्रशांत गिरी विभाग प्रमुख गजेंद्र खुणे , सदानंद जोगदंड,अशोक सपकाळ,तात्यासाहेब कांबळे माणिक डोके लिंबराज गपाट उपतालुका प्रमुख अशोक वनवे,श्रीमंत भरके सिद्धेश्वर कुठे,संजय नाईकनवरे,प्रशांत गिरी व इतर शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.