
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार
कार्तिकेन एस. हे गेल्या पासुन कंधार तहसिल कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी मनमानी कारभार चालवला असुन कधी पण या आणी कधी ही जा असाचा प्रकार सध्या चालु असल्याने नागरीकांचे बेहाल होत आहेत.सध्या हंगामी दिवस असताना ही शेतकरी,मंजुर यांना आपल्या शेतीतले कामे सोडुन यावे लागत आहे.येथिल कर्मचारी व अधिकारी हे तहसिल कार्यालयामध्ये जनतेचे कामे वेळेत होत नाहीत वारंवार तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. या संदर्भात अनेक तक्रारी समोर येत असल्याने माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली तेव्हा बरेच कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर होते .या सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .
काही महिन्यापुर्वी I-S कार्तिकेन एस.हे कंधार तहसिलदार म्हणून आले होते.त्यांनी एकाच माहिन्यात महत्वपुर्ण निर्ण मार्गी लावले.तर कंधार तहसिल कार्यालयातील अधिकारी वकर्मचारी यांना चांगलीच शिस्त लावली होती.त्यामुळे हे कार्यमचारी सकाळी 10वाजता कार्यालयात हजर राहत होते तर 10-15मिनिटात संगणक चालु होत होते त्यामुळे नागरीकांचे कामे वेळेवर होत होते.कार्तेकेन गेल्यापासुन येथिल खर्मचारी व आधिकारी यांनी मानमानी चालवली आहे.तहसिल कार्यालयाला सांभाळण्यासाठी कायम स्वरुपी तसुलदार मिळत नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत.कंधार तहसिलदार हे अतिरिक्त पदभारावर असल्यने सध्या तहसिल रामभारोसे चालत आहे.जे काम पंधरा दिवसात होणारे असते त्या कामाला पंधरा महिने तहसिल कार्यालयाच्या चक्रा मारुन सुध्दा जनतेला न्याय मिळत नाही. वशीला घेवून काम करणे असे प्रकरणे नेहमीच घडत असून वेळोवेळी तहसिलदार व संबधित नायब तहसिलदार यांना यांना तोंडी विनंती केली तसेच तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या परंतू तहसिल कर्मचाऱ्यांवर कुठलीच वेळेवर कार्यवाही झाली नाही .अशी तक्रार आज निवेदनात करण्यात आली.विशेष म्हणजे तहसिल कार्यालयामध्ये कर्मचारी हे कधीच वेळेवर येत नसले तरी कार्यालयाचा वेळ संपण्यापूर्वीच घरी निघून जात आहेत त्यामुळे या सर्व कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली . यावेळी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , पोचीराम वाघमारे , कंधार तालुका अध्यक्ष कांबळे माजी सैनिक संभाजी कल्याणकर आदीसह माजी सैनिक उपस्थित होते .