दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
मागील शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना हा व्हायरस देशामध्ये आल्यामुळे १६ मार्च 2022 लाच शासनाने कडक निर्बंध लादून संपूर्ण शाळा आणि शिक्षणव्यवस्था थांबली होती.
हे चालत असताना श्रीमंत व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस होमट्यूशन हे पर्याय पैशाच्या पुढे सुचत होते परंतु ग्रामीण भागातील हुशार पण आर्थिकरित्या थोडे कमकुवत व सुविधांअभावी मात्र हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच राहत असताना दिसत होते. शाळा नाही आणि अभ्यास नाही घरच्यांचं ऐकायचं नाही, खेळ खेळण्यासाठी बाहेर पण निघायचं . या सगळया गोष्टीला कंटाळून काही पालकांच्या आग्रहास्तव दिनांक 5 जुलै 2020 ला संगमवाडी येथे समर्थ कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आला.
कोरोना काळात सोशल डिस्टन्स आणि जास्त काळजी घेऊन गावातच वर्ग शिकवणीचं काम चालू केल व 2 वर्ष झाली तरीही चालु च आहे .
विद्यार्थ्यांना घडवन्यामध्ये त्यांनी मन लावून काम केलेल दिसतंय. आपल्या •शिकवणीवर अनेक विद्यार्थी आणि पालक खुशही झाले आहेत आणि होत आहेत माधव गोटमवाड नवतरुण युवक तळमळीने शिकवणारा शिक्षक म्हणून कमी कालावधीमध्ये त्यांनी एक चांगली ओळख निर्माण केली आहे.
आज 5 जुलै 2022 ला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त समर्थ कोचिंग क्लासेस संगमवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असे क्लासेस चे संचालक माधव गोटमवाड सर यांनी सांगितले.
