
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:लोकमत न्यूज नेटवर्क देगलूर शहर व ग्रामीण भागातील महा-ई-सेवा आणि सेतू सुविधा केंद्राचे कामकाज चालवणाऱ्या महा आयटी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊन वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे. यामुळे मागील पाच ते सहा दिवसांपासून महा ई-सेवा केंद्रातील संपूर्ण सेवा ठप्प झाली आहे.
राज्य सरकारच्या महा आयटी विभागामार्फत महा ई-सेवा आणि सेतू सुविधा केंद्र चालविले जाते. या केंद्रातून नागरिकांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, सातबाराचा उतारा, होल्डिंग प्रमाणपत्र, यासह एकूण ४२ प्रकारचे दाखले ऑनलाइन दिले जातात.
शासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक गाव स्तरावर महा ई सेवा केंद्र दिले आहे.
देगलूर शहरात एकूण सहा महा ई सेवा केंद्र उपलब्ध करून दिले आहेत.