
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
तुझं येणं तुझं जाणं फारच लहरी,
कधी ऊन तर कधी सरीवर सरी..
तुझ्या येण्याचा पोशिंद्याला आनंद,
लहानग्यांना भिजण्याचा आनंद..
भरलेल्या शिवारात पाहतो मी हरी,
तुझं येणं तुझं जाणं फारच लहरी..
कधी तू अगदीच शांत निर्मळ स्वच्छंदी,
तुझ्या आगमनाने होती सारेच आनंदी..
पावसाळा म्हणजे जणू स्वर्गाची वारी,
तुझं येणं तुझं जाणं फारच लहरी..
या आनंदाला ही आहेत काही अपवाद,
मुसळधार बरसून कित्येक आयुष्य केलीस बरबाद..
माळीण दुर्घटना अन् सावित्रीची आठवण नाही बरी,
तुझं येणं तुझं जाणं फारच लहरी..
कधी असते तुझी रिमझिम संततधार,
तर कधी होतो तुझा आक्रोश मुसळधार..
अन् करून टाकतोस स्वप्ननगरीची तुंबापुरी,
तुझं येणं तुझं जाणं फारच लहरी..
तुझ्या लहरीपणाला कदाचित मीच आहे जबाबदार,
ऐसपैस जगण्याच्या नादात वृक्षसंवर्धन विसरूनच गेलो यार..
आम्ही ही समजून चुकलो तुझा स्वभाव लहरी,
घेतो शपथ वृक्षरोपणासह संवर्धनाची जबाबदारी..✍️✍️✍️✍️ जे.एस.बेटकर सर