
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी तालुका वाडा -मनिषा भालेराव
वाडा तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता ८वी ते १०वी विद्यार्थ्यांना वह्या वाटप(दि १जुलै )रोजी तसेच अनेक विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले या वेळी
वाड्याचे शिक्षणप्रेमी गटविकास अधिकारी श्री. डॉ. राजेंद्रकुमार खताळ आणि त्यांचे मित्र भरत आंधळे, अतिरिक्त आयुक्त Income tax 1. BS मुंबई विभाग, यांच्या सहकार्याने उज्जैनी
मांडवा व गारगाव या केंद्रातील १२ शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप व २५०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनी, गारगाव, मांडवा या केंद्रातील शाळांमधील मुलांना पावसाळा ही शाळेमध्ये दररोज येण्यासाठी एक मुख्य अडचण आहे. विदयार्थीच्या घरची आर्थिक स्थिती बऱ्याच ठिकाणी हलाखीची असल्याने प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाला छत्री देणे शक्य नसते. शाळेत यायच्या वेळी पाऊस असला की अनेकदा विदयार्थी शाळेत येणे टाळत असत.
त्यामुळे यावर उपाय तातडीने उपाय करणे गरजेचे असल्याचे गट विकास अधिकारी खताळ यांनी आपले मित्र भरत आंधळे यांना सांगितले आणि दोघांच्या समनव्याने मुलांना रेनकोट आणि वह्यांचे वाटप केले.
ग्रामीण भागातील विदयार्थ्यांची शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अत्यावश्यक गरज पूर्ण केल्या बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. मागील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात देखील अशीच मदत या दोन अधिकाऱ्यांनी केली होती.
या सामाजिक कार्याबद्दल भरत आंधळे मुंबई व डॉ. राजेंद्रकुमार खताळ, गटविकास अधिकारी, वाडा यांचे कौतुक होत आहे.