
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : हिंदू धर्म संपुर्ण जगात व्यापलेला आहे. कोणत्या ना कोणत्या देशात हिंदू देवीदेवतांचे संदर्भ आढळून येतात. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरे सुद्धा आहेत. जेव्हा आपण जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराबद्दल बोलतो, तेव्हा आपण सहसा तामिळनाडूमधील रंगनाथ स्वामी मंदिराचा उल्लेख करतो पण तुम्हाला माहिती आहे का की 6 लाख 31 हजार स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले तमिळनाडूनचे हे मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर नाही.
होय, हे खरंय जगातील सर्वात मोठे मंदिर भारतात नाही तर कंबोडिया देशामध्ये आहे. या मंदिराचे नाव अंकोरवाट आहे. हे मंदिर सिमरीप शहरात आहे.आश्चर्यकारक म्हणजे या देशात एक पण हिंदू नाही.
ब्रिटनच्या जॉन्सन सरकारला झटका; आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांचे राजीनामे
हे अंकोरवाट मंदिर भगवान विष्णूचे असून या मंदिराचे क्षेत्रफळ 8 लाख 20 हजार चौरस मीटर आहे. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणूनही घोषित केले आहे. हे मंदिर जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते तर मंदिर इसवी सन १११२ ते ११५३ या काळात हे मंदिर बांधले गेले.
जगातील सर्वात मोठ्या मंदिराचा आकार दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराच्या 4 पट आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराभोवती खाईच्या स्वरुपात संरक्षक कवच आहे ज्याची रुंदी 700 फूट आहे.
दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग
मंदिर एका उंच जागेवर वसलेले आहे, ज्याला तीन खंड आहेत. या तिन्ही खंडात शिल्पे तयार करण्यात आली आहेत. मुख्य मंदिरात जाण्यासाठी प्रत्येक खंडातून पायऱ्या केल्या आहेत. प्रत्येक विभागात 8 घुमट आहेत. हे सर्व घुमट १८० फूट उंच आहेत. मुख्य मंदिर तिसऱ्या खंडच्या वर आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी सुमारे 1000 फूट रुंदीचा मोठा दरवाजा बनवण्यात आला आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या दगडी भिंतींनी मंदिर वेढलेले आहे. भिंतीनंतर 700 फूट रुंद खाई आहे, त्यावर एका ठिकाणी 36 फूट रुंद पूल आहे.