
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
मंठा तालुक्यातील केंधळी हे गाव मंठा शहरापासून जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. शहर जवळ असल्याकारणाने दारूचा पुरवठा या गावाला लवकरात लवकर व जास्त प्रमाणात होतो. त्याचमुळे गावातील तरुण मंडळी दारूच्या आहारी जात आहेत . आणि जास्तीत जास्त तरुण मुलं या दारूच्या आहारी जात असल्याकारणाने या सर्वाचा फटका तो माता बहिणीला बसत आहे. माता भगिनी दिवसभर मोलमजुरी करून आपला घर संसार चालवण्याचा प्रयत्न करतात परंतु नवरा व तरुण मुलगा या दारूच्या आहारी गेल्यामुळे माता भगिनीला खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच शासनाने 50% व गावकऱ्यांनी 50 टक्के मिळून गावातील देशी विदेशी व गावठी दारू लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी या सर्व गावकरी व माता-भगिनी करीत आहेत.