
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील दलित वस्तीतील रस्ता व नाले अल्पशा पाऊस होता खड्डेमय झाला असून या रस्त्याने चालताना जीव मोठे धरून रस्ता पार करावा लागतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा रस्त्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याशिवाय रस्ता होणार नाही की काय असा संताप जनक सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर अक्षरशः काही ठिकाणी तळे साचले तर काही ठिकाणी रस्त्याने जाताना पुढील चांगला रस्ता गाठण्यासाठी तळ्यात पोहुन जावे लागेल की काय अशी शंका चालणार्यांना येत आहे या त्रासाला कंटाळलेल्या या रस्त्याची कटकटी कधी संपणार असे खडे बोल सुनावले जात आहेत. रस्त्यासाठी शेतकरी ,वाहन चालक नागरिकांचा उद्रेक होण्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लावून एखांदा संभाव्य अपघात होण्यापूर्वी खडे मय रस्त्या पासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी किसान सेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांनी केली आहे