दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
आझाद ग्रुपच्या लोहा तालुका अध्यक्षपदी रुद्रा पाटील भोसकर यांची निवड करण्यात आली आहे. तर नांदेड जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी छायाचित्रकार तथा पञकार विनोद महाबळे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहा तालुक्याचे भूमिपूत्र तथा पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक असणारे आझाद ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे नको राजकारण १०० टक्के समाजकारण आपण या समाजाचे काही देणे घेणे लागतोत हे ध्येय समोर ठेवून गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी आझाद ग्रुपची स्थापना केली असून तिचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात येत असून यात नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका कार्यकारिणीची निवड आझाद ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केली असून.
नांदेड जिल्हा प्रसिध्दपदी छायाचित्रकार तथा पञकार विनोद महाबळे यांची निवड करण्यात आली आहे. आझाद ग्रुपच्या लोहा तालुकाध्यक्षपदी रुद्रा पाटील भोस्कर , कार्याध्यक्ष चंद्रकांत देवकते, उपाध्यक्ष गजानन जाधव, संघटक माणिक पाटील पवार यांची निवड करण्यात आली आहे.
याबद्दल निवडी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
