
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
पन्हाळा नगरपरिषद कायमच शासनाच्या प्रत्येक कार्यात सहभाग असतो त्याचप्रमाणे आता नगरपरिषद मार्फत व महाराष्ट्र शासनाच्या सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण २०१३ च्या अनुषंगाने तसेच मा . जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या सुचनेनुसार पन्हाळा शहरात जेष्ठ नागरिकां करिता महालक्ष्मी मंदिर परिसर व शिवतीर्थ उद्यान या ठिकाणी याप्रमाणे एकूण दोन विरंगुळा केंद्र स्थापन करणेत आली आहेत . सदर ठिकाणी जेष्ठ नागरिकां करिता बसण्याकरिता बाकांची सोय असून वाचनासाठी दैनिक वृतपत्रे उपलब्ध ठेवणेत येणार आहेत,तसेच सदर ठिकाणी जेष्ठ नागरिकांकरिता आवशक्यतेनुसार विविध सोयी उपलब्ध करून देणेत येणार आहेत.तरी पन्हाळा शहरातील जेष्ठ नागरिकांनी सदर विरंगुळा केंद्राचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आवश्यक सोयी उपलब्ध करून घेणे करिता नगरपरिषदेशी संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती स्नेहलता कुंभार यांनी केले.तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून ही बातमी समजतात त्यांच्या आनंदाचे वातावरण तयार झाले आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्या उठण्यासाठी एक चांगले व्यासपीठ त्या ठिकाणी तयार होऊ शकते असे मत ज्येष्ठ नागरिक बालेखान मुक्तवल्ली यांनी मांडले.