दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गुरुपौर्णिमा उत्सवाला राज्यभरातून हजारो भाविक येणार
गंगापूर – जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव भक्त परिवाराचे राजधानी आश्रम असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे संपन्न होणार आहे. गुरुपौर्णिमा निमित्त बालसंस्कार शिबीर, बाल गोपाल जपानुष्ठान सह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचा प्रारंभ जय बाबाजी अशा प्रचंड जय घोषात वेरूळ नगरीत करण्यात आला.गुरुपौर्णिमा उत्सवात राज्यभरातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
निष्काम कर्मयोगी जगदगुरू
जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने उत्तर प्रदेशातील श्रीक्षेत्र काशी येथील आश्रमासह राज्यभरातील पंढरपूर आणि इतर विविध आश्रमात गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न होणार आहे.मात्र गुरुपौर्णिमेचा मुख्य सोहळा भक्त परिवाराचे राजधानी आश्रम असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक १३ जुलै रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ नुकताच वेरूळ आश्रमात जय बाबाजी.. जय महात्माजी.. अशा प्रचंड जय घोषात आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यावेळी मौनव्रतातील बाल गोपाल जपानुष्ठान सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यासोहळ्या दरम्यान रोज
पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी,ध्यान,जप,प्राणायाम,एकनाथी भागवत वाचन ,महाआरती, सत्संग,प्रवचन, आदी विविध उपक्रम संपन्न होणार आहेत. गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पवित्र पालखीची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.विद्यार्थी संस्कार शिबिरा प्रसंगी विद्यार्थ्यांना आठवडाभर
मौनव्रत देण्यात आले.
आश्रमाच्या वतीने सुरू असलेले उगाव खेडे,महालगाव, संवदगाव,टूणकी,उपखेड येथील गुरुकुलातील विद्यार्थी संस्कार शिबीरात साहभागी झाले आहेत.भक्त परिवाराच्या पंढरपूर व काशी येथील आश्रमासह राज्य भरतील शेकडो आश्रमात गुरुपौर्णिमा निमित्त पाद्य पूजन,अभिषेक,प्रासाद वाटप आदींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र मुख्य सोहळा श्रीक्षेत्र वेरूळ येथे संपन्न होणार असल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो भाविक येत्या बुधवार
दिनांक १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेला श्रीक्षेत्र वेरूळ आश्रमात दाखल होणार असल्याचे भक्त परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
