
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
मुंबई येथे आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रशासनांच्या महत्त्वांच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी मराठवाड्यांसाठी आणि राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यांत आले. त्यामध्ये कोल्हापूर सांगली पुराचे पाणी हे मराठवाड्यांत वळविण्यांत संदर्भात निर्णय घेण्यात आला या संदर्भात आराखडा तयार करण्यांच्या आदेश मुख्यमंत्री यांनी जारी केले आहेत. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आज झालेल्या बैठकीमध्ये जागतिक बँकेचे अधिकारी उपस्थिंत होते. सांगली व कोल्हापूर मध्ये गेले दोन वर्षापासून पूर येत असुन यासाठी सरकारकडूंन उपाययोजना हे पुराचे पाणी मराठवाड्यांत वळविण्यांत येणार असा निर्णय मुख्यमंत्री यांनी आज झालेल्या बैठकीत घेतला. पाणी वाटपाचा कायदा पुराच्या पाण्यांला लागू होत नाही म्हणून पुराचे पाणी मराठवाड्यांत वळविण्यांत येणार आहे. बोगदे तयार करुन हे पाणी मराठवाड्यांत नेण्यांत येणार असून या प्रकल्पांला निधी देण्यांसाठी जागतिक बँकेने सहमती दर्शवली आहे या प्रकल्पांचा लवकरच आराखडा बनविण्यांचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.