
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – दि 05 रोजी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत मा श्री संतोष दादा चौधरी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार मा श्री गजानन भगत साहेब राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख व मा श्री सुनिल भाउ पाटील यांच्या सुचनेनुसार संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटिल यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर जिल्हा यांच्या वतीने पोलीसांच्या आठ तासांच्या डुयुटी व ईतर मागण्यां संदर्भात मा श्री मनिष कलवानिया पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामिण यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटिल,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम, युवा जिल्हा अध्यक्ष तेजस आरखडे, संभाजीनगर शहर पुर्व तालुका प्रमुख कैलास भाउ बनकर, वैजापूर तालुका प्रमुख मजनू पठाण, बंडू पांचाळ बनकर, राजेंद्र बनसोडे, राजु थोरात,मंगल ताई गाजकर, कावेरी बनसोडे, सविता भोकरे, संगिता शेळके आदी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.