
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
लाखेवाडी तालुका इंदापूर येथील दिलीप पोपट ढोले व श्रीमंत पोपट ढोले यांचे वडील कैलासवासी पोपट नाना ढोले यांचे प्रथम पुण्यस्मरण व (वर्षश्राद्ध) निमित्त शनिवार दिनांक 9 रोजी 12 वाजता ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणा यांची कीर्तन सेवा सकाळी 10 ते 11/45 या वेळेत होणार आसल्याने. पोपट नाना ढोले यांचे पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण भागामधील भाविक भक्त, भजनी मंडळ, कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
दुपारी 12 वाजता पोपट ढोले यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव टाळ गजर व नामांचा आवाज करून शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता होईल.